Rotary Disabled Center

सर्वांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
माणूस म्हणून जन्माला येणे हे आपल्या सर्वांचे भाग्यच आहे. मानव हा एक सामाजिक प्राणी आहे. बहुतांशी सर्वांनाच समाजाचा एक कर्तव्यदक्ष घटक होण्याची इच्छा असते. प्रत्येक जण, “आपण समाजाचे देणे लागतो” या भावनेने येनकेन प्रकारे सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करत असतोच. आपणास सांगण्यास आनंद होतो की रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याण “रोटरी दिव्यांग सेंटर” हा उपक्रम यशस्वीरित्या राबवीत आहे. आजतागायत त्यात हजारो रुग्णांना कृत्रिम हात पाय म्हणजेच जयपूर फूट बसविण्यात आले आहे. मला सांगताना अभिमान वाटतो की प्रत्येक रोटेरियन तन-मन-धनाने स्वतःला या उपक्रमात झोकून देऊन मोलाचे काम करीत आहे. याबद्दल सर्वांचे अभिनंदन.
ह्याच प्रकल्पाचा भाग म्हणून आम्ही घेऊन येत आहोत एक आगळीवेगळी दैनंदिनी पुस्तिका म्हणजेच डायरी. आपणा सर्वांना आवाहन आहे की जास्तीत जास्त डायरीज् खरेदी करून आपणही या प्रकल्पाच्या यशामध्ये खारीचा वाटा उचलू शकता. नाममात्र चारशे रुपये प्रत्येक डायरी ची किंमत आहे. नूतन वर्षानिमित्त आपल्या आप्तस्वकीयांना उत्तम अशी सदिच्छा भेट म्हणून आपण ती घ्यावी हीच सर्वांना विनंती.
“एखाद्या व्यक्तीला स्वतःच्या पायावर चालण्यास आपण मदत करत आहोत” ही भावनाच खूप उदात्त व सर्वोत्तम आहे. चला तर मग
“एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ”.
इच्छुक मित्रांनी आणि बंधू-भगिनींनी खालील नंबर वरती व्हाट्सअप मेसेज पाठवा; आम्ही तुम्हाला पैसे भरण्याचा तपशील पाठवू. मेसेज मध्ये डायरीज् ची संख्या जरूर सांगा.
व्हाट्सएप नंबर आहे 9869449758.

Our Official Facebook Handle : Yash Children Hospital
Our Official Instagram Handle : Yash Children Hospital

So like us on Facebook and follow on Instagram!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *